ठाकरी तोफ कोणावर धडाडणार? आज पाचोऱ्यात सभा, पहा जय्यत तयारी
त्याचबरोबर या लॅबच्या प्रांगणातील माजी आमदार तथा निर्मल सीड्सचे संस्थापकीय अध्यक्ष स्व. आर ओ. (तात्या) पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणही करण्यात येणार आहे.
जळगाव : शिवसेना दुभंगल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच जळगाव दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्ताने जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी ठाकरे गटाने केली आहे. पाचोरा येथे रविवारी सायंकाळी ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यांच्या हस्ते निर्मल सीड्सने उभारलेल्या अत्याधुनिक मायकोरायझा लॅबचे उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर या लॅबच्या प्रांगणातील माजी आमदार तथा निर्मल सीड्सचे संस्थापकीय अध्यक्ष स्व. आर ओ. (तात्या) पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणही करण्यात येणार आहे. यानंतर त्यांची जाहीर सभा येथे होणार आहे. सध्या या सेभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. तर सभेला दीड लाखांची उपस्थिती राहील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त शिवसैनिकांमधील आनंद व उत्साह शिगेला पोहोचला आहे.
Published on: Apr 23, 2023 08:52 AM