‘तुमचं व्यवस्थित पुनर्वसन होईपर्यंत मी तुमच्यासोबतच’; उद्धव ठाकरे यांचा इर्शाळवाडीच्या नागरिकांना वचन

| Updated on: Jul 22, 2023 | 1:33 PM

याच दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज इर्शाळवाडीला भेट दिली. त्यांनी बचावलेल्या ग्रामस्थांशी पंचायत मंदिरात संवाद साधला.

रायगड | 22 जुलै 2023 : रायगडमधील इर्शाळवाडीत दरड कोसळून 24 जणांचा मृत्यू झाला. यानंतर येथे चौथ्या दिवशी देखील मदत आणि बचावकार्य सुरू आहे. याच दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज इर्शाळवाडीला भेट दिली. त्यांनी बचावलेल्या ग्रामस्थांशी पंचायत मंदिरात संवाद साधला. यावेळी त्यांनी, बोलण्यासाठी आपल्याकडे शब्दच नाहीत. पण यावेळी मी तुम्हाला एक वचन देतोय. मी फक्त येथे तोंड दाखवायला आलो नाही. तुमचं व्यवस्थित पुनर्वसन होईपर्यंत मी तुमच्यासोबत राहीन. आसपासच्या वस्त्यांशीही संपर्क करू. तुमच्या सर्वांचं पुनर्वसन एका व्यवस्थित जागी करू. ज्यामुळे पुन्हा असा संकंटाला तुम्हाला तोंड द्यावं लागणार नाही. तर ही दुर्घटना होण्याआधीच जर पुनर्वसन झालं असतं तर इतकी मोठी दुर्घटना झाली नसती असही ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Published on: Jul 22, 2023 01:33 PM
“अशा दुर्घटना रोखण्यासाठी सर्व राजकारण्यांनी एकत्र यावं”, उद्धव ठाकरे यांचं आवाहन
कोल्हापूरची पंचगंगा पात्राबाहेर; 2019 च्या पुराच्या ताज्या झाल्या आठवणी, पहा ड्रोन दृश्य