बंगलो गेले कुठं? सोमय्या यांना प्रश्न? आज जाणार कोलाईला
अलिबागमधील ठाकरे कुटुंबीयांचे 19 बंगले अचानक कुठे गायब झाले याची माहिती घेणार आहेत. याच्याआधी त्यांनी आपली प्रतिक्रीया दिली. आजची कोलाई भेट ही शांततापूर्ण असणार असून ती टेक्निकल असेल. ती पुराव्यांच्या मागणीसाठी असेल
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाहीये. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल करण्याचे ठरवले आहे. ते अलिबागमधील कोलाईला जाणार आहेत. तसेच अलिबागमधील ठाकरे कुटुंबीयांचे 19 बंगले अचानक कुठे गायब झाले याची माहिती घेणार आहेत. याच्याआधी त्यांनी आपली प्रतिक्रीया दिली. आजची कोलाई भेट ही शांततापूर्ण असणार असून ती टेक्निकल असेल. ती पुराव्यांच्या मागणीसाठी असेल. कारण एकीकडे रश्मी ठाकरे म्हणातात हे आपले आहेत आणि उद्धव ठाकरे निवडणुकीत ती जमिन फक्त आपली आहे. त्यामुळे नक्की खरे कोण उद्धव ठाकरे की रश्मी ठाकरे असा प्रश्न पडल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आपण त्याजागी जात बंगले पाहणार आहोत असेही ते म्हणाले.
Published on: Apr 17, 2023 10:41 AM