अजित पवार गटाच्या सत्तेत प्रवेशाने शिंदे गटाच्या….; उद्धव ठाकरे यांनी खातेवाटपावरून साधला निशाना
माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे दोघेही वेगवेगळे राज्याच्या दौऱ्यावर होते. नुकताच उद्धव ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावरून परतले आहेत. तर नागपूर मध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेमुळे सध्या वाद सुरू आहे.
मुंबई : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील फूट पडली आहे. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे दोघेही वेगवेगळे राज्याच्या दौऱ्यावर होते. नुकताच उद्धव ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावरून परतले आहेत. तर नागपूर मध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेमुळे सध्या वाद सुरू आहे. याचदरम्यान त्यांनी आज पत्रकार परिषद घेत यावर आपली प्रतिक्रिया दिली. याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेतील प्रवेशावर आणि रखडलेल्या खातेवाटपावर टीका केली आहे. यावेळी ठाकरे यांनी शिंदे गटावर यावरून जोरदार निशाना साधताना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आधी 20 मंत्री आणि आता राष्ट्रवादीच्या नव्या 9 नेत्यांचा समावेश झाला आहे. म्हणजे मंत्री मंडळात 29 मंत्री झाले आहेत. याच नव्या 9 मंत्र्यांनी शिंदे गटाला नाकीनऊ आले आहेत असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.