उद्धव ठाकरे यांना नागपूरात उत्तर; कलंक की भुषण? थेट ठाकरे यांना होर्डिंग्जमधून सवाल?
ठाकरे यांनी नागपूर येथील भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख नागपूरला लागलेला कलंक असा केला. त्या एका शब्दावरुन राज्यात वादंग माजला होता. तर भाजपकडून ठाकरे यांच्यावर टीका केली होती. तर फडणवीस यांनीही ट्विटरवर आठ मुद्दे मांडून ठाकरेंना कलंकी काविळ कशी झाली आहे हे सांगितलं होतं.
नागपूर | 22 जुलै 2023 : ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख नागपूरला लागलेला कलंक असा केला. त्या एका शब्दावरुन राज्यात वादंग माजला होता. तर भाजपकडून ठाकरे यांच्यावर टीका केली होती. तर फडणवीस यांनीही ट्विटरवर आठ मुद्दे मांडून ठाकरेंना कलंकी काविळ कशी झाली आहे हे सांगितलं होतं. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे असं म्हटलं होतं. त्यानंतर कलंकवरून सुरू झालेलं राजकारण शांत झालं होतं. मात्र पुन्हा एकदा आता कलंकवरून नागपुरात राजकारण गरम होण्याची शक्यता आहे. नागपुरात फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. मात्र यावेळी या होर्डिंग्जमधून ठाकरे यांना उत्तर देण्यात आलं आहे. फडणवीस भुषण असून ते कलंक नाहीत असे म्हटलं आहे. तर एक रुपयांत शेतकऱ्यांना पीक विमा देणारे फडणवीस महाराष्ट्राला कलंक की भुषण? असा सवाल केला आहे. यावेळी होर्डिंग्जवर फडणवीसांचा नाही शेतकऱ्यांचा भला मोठा फोटो लावला आहे. दरम्यान हे होर्डिंग्ज कुणी लावले याची माहिती मिळालेली नाही. तसेच लावणाऱ्यांचं नाव देखील या होर्डिंग्जवर नाही.