Sharad Pawar-Ajit Pawar meeting : पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या ‘त्या’ दाव्यावरून राष्ट्रवादी नेत्याचा टोला
अजित पवार आणि शरद पवार यांच्या पुण्यातील भेटीवरून सध्या अनेक चर्चा होत आहेत. तर यावरून एका जेष्ठ काँग्रेस नेत्याने थेट दावा केला आहे. त्यावरून आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून टीका केली जात आहे.
मुंबई : 16 ऑगस्ट 2023 | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात काका शरद पवार यांची गुप्त भेट घेतली होती. ही भेट पुण्यातील एका उद्योगपतीच्या घरी घेतली होती. त्यावरून सध्या अनेक चर्चा होत आहेत. तर अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यासाठी शरद पवार यांना भाजपमध्ये यावं लागेल, असा संदेश देण्यासाठीच अजित पवार तेथे गेले असा दावा काँग्रेस नेत्याने केला आहे. तसेच भाजपने शरद पवारांना मोठी ऑफर दिली असून त्यांना केंद्रात कृषीमंत्री पद दिलं जाईल असा दावा देखील काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमल मिटकरी यांनी टीका केली आहे. मिटकरी यांनी, तर बैठकित काय झालं हे त्यांना कळत असेल तर ते आंतरयामी झालेत. त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं. त्यांनी आमच्या पक्षाकडे लक्ष देऊ नये. त्यांना आमच्या पक्षात काय सुरू आहे हे पाहण्याची फार जूनी आणि ङान सवय आहे. त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा. त्यांनी त्यांच्यापक्षातील किती लोक फुटतात याकडे लक्ष द्यावं.