दसरा मेळाव्याआधी शिवसेनेला बसणार आणखी एक धक्का; शिवसेनेचे माजी नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर?

| Updated on: Sep 22, 2022 | 9:39 AM

शिंदे गटात शिवसेनेच्या नेत्यांचे  आणि पदाधिकाऱ्यांचे इन्कमिंग सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. आता दसरा मेळाव्यापूर्वी आणखी काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी हे शिंदे गटात सामील होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

नाशिक :  काही दिवसांपूर्वीच आम्ही शिवसेनेशी (Shiv Sena) एकनिष्ठ आहोत असा दावा नाशिकमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. मात्र आता शिवसेनेला नाशिकमध्ये (Nashik) मोठं खिंडार पडण्याची शक्यता असल्याची बातमी समोर येत आहे. प्रवीण तिदमे यांच्या पाठोपाठ काही माजी नगरसेवक शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. येत्या दसरा मेळाव्याच्या आधी हे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. दुसरीकडे नाशिकमध्येच शिंदे गट काँग्रेसला (Congress) देखील धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहे. काँग्रेसचे काही ज्येष्ठ नगरसेवकही शिंदे गटाच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. शिंदे गटात शिवसेनेच्या नेत्यांचे  आणि पदाधिकाऱ्यांचे इन्कमिंग सुरूच  असल्याचं पहायला मिळत आहे. यापूर्वी ठाणे, औरंगाबाद येथील अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता नाशिकमधील पदाधिकारी देखील शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे.

 

Published on: Sep 22, 2022 09:39 AM
मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधानांची भेट घेणार; ‘या’ महत्त्वाच्या विषयांवर होणार चर्चा
Video| कितीही करा हल्ला… लय मजबूत हाय बारामती किल्ला… मिशन बारामतीवरून भाजपाला ‘या’ नेत्याने सुनावलं…