भारतीय क्रिकेट टीमचा मुख्य निवडकर्ता म्हणून अजित आगरकरची निवड

| Updated on: Jul 05, 2023 | 9:04 AM

आगामी वनडे वर्ल्ड कपच्या अनुशंगाने ही निवड महत्वाची मानली जात आहे. तर क्रिकेट सल्लागार समितीच्या मुलाखतीनंतर आगरकरची निवड करण्यात आली आहे. तर चेतन शर्मा हे स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकल्यामुळे त्यांच्या पदाचा राजीनामा फेब्रुवारी 2023 मध्ये दिला होता.

मुंबई : भारतीय क्रिकेट बोर्डाने निवड समितीच्या अध्यक्षपदावरून मोठी घोषणा केली आहे. यावेळी बोर्डाने भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य निवडकर्ता म्हणून माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता दुसरा कपिल देव मानला जाणारा आगरकर हा भारतीय क्रिकेट संघाला मुख्य निवडकर्ता म्हणून मिळाला आहे. मंगळवारी संध्याकाळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ही घोषणा केली. तर आगामी वनडे वर्ल्ड कपच्या अनुशंगाने ही निवड महत्वाची मानली जात आहे. तर क्रिकेट सल्लागार समितीच्या मुलाखतीनंतर आगरकरची निवड करण्यात आली आहे. तर चेतन शर्मा हे स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकल्यामुळे त्यांच्या पदाचा राजीनामा फेब्रुवारी 2023 मध्ये दिला होता. अजित आगरकरने भारतासाठी 26 कसोटी, 191 वनडे आणि 4 टी-20 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 349 आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत.

Published on: Jul 05, 2023 09:04 AM
असीम सरोदे यांचा भाजपवर गंभीर आरोप; म्हणाले, “एकनाथ शिंदे यांचं डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी…”
“राष्ट्रवादीच्या बंडामागे शरद पवारच, मला ‘ही’ तीन माणसं संशयास्पद वाटतात”, राज ठाकरे यांचं वक्तव्य