‘दंगल पेटवण्याचं त्याला कॉन्ट्रक्ट, तो तर किडे’; राष्ट्रवादीचा नेता संभाजी भिडे यांच्यावर भडकला
शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे ऊर्फ मनोहर कुलकर्णी हे त्यांच्या वात्रट वक्तव्यांमुळे चांगलेच चर्चेत असतात. आता त्यांच्या नावावरून वाद सुरू झाला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गटाने सवाल उपस्थित केला आहे.
पुणे | 20 ऑगस्ट 2023 : शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे ऊर्फ मनोहर कुलकर्णी हे त्यांच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रसिद्ध आहेत. मागिल ही महिन्यात त्यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करत टीका ओढावून घेतली होती. तर आता त्यांच्याच नावावरून वाद उफाळला आहे. तर भिडे यांच्यावरून सरकारला सवाल केले जात आहे. याचवरून अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी आणि शरद पवार गटाचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे. ही टीका त्यांनी राष्ट्रवादीच्या आयोजित पुण्यातील सोशल मीडिया शिबीरात केली. यावेळी त्यांनी त्या भिडेला महाराष्ट्रात पहिला विरोध केला तो मी असे म्हटलं आहे. तर तो मनोहर भिडे आहे की काय? पण तो विकृत विचाराचा म्हातारा आहे, हेच खरं आहे. तो भिडे नाही किडे आहे. त्याच्यावर कारवाई होणार नाही. तर तशी हरयाणात बिट्टू बजरंगीने दंगल पेटवली तशीच राज्यात भिडेला दंगल भडकवायच्या आहेत. त्याच्याकडे दंगल लावायची जबाबदारी दिली आहे. तर त्याला हिंदू-मुसलमान दंगल पेटव असं सांगण्यात आलयं असा आरोप आव्हाड यांनी केलाय. तर याच भिडेचे बाबत छगन भुजबळ यांनी देखील काय म्हटलं आहे ते पाहा…