‘कोल्हापूरमध्ये काही ना काही घडणार?’ काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी कसली व्यक्त केली भीती?
गेल्या काही दिवसांपासून आजरा, इचलकरंजी, पेठवडगाव, हुपरी, पन्हाळा या परिसरात कमी अधिक प्रमाणात धार्मिक वादाच्या घटना घडल्या आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. तर तर कोल्हापूर हिंदुत्ववादी की पुरोगामी हा वाद ही चिघळत आहे.
कोल्हापूर : काही दिवसांपासून राज्यातील दंगलीवरून आरोप प्रत्यारोप झालेले पहायला मिळाले आहेत. इतर जिल्ह्यातील हा वाद संपतोनासंपतो तोच कोल्हापूर येथील ऐतिहासिक पन्हाळा गडावर एका मजारिचे समाजकंटकांडून मोडतोड करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात जातीय दंगली घडवण्याचा घाट असल्याचा आरोप माजी गृहराज्यमंत्री तथा काँग्रेस आमदार सतेज पाटील केला आहे. गेल्या काही दिवसांपासून आजरा, इचलकरंजी, पेठवडगाव, हुपरी, पन्हाळा या परिसरात कमी अधिक प्रमाणात धार्मिक वादाच्या घटना घडल्या आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. तर तर कोल्हापूर हिंदुत्ववादी की पुरोगामी हा वाद ही चिघळत आहे. त्यामुळे धार्मिक दंगलीने वातावरण भडकायचे की सलोख्याचे वातावरण कायम ठेवायचे हे आता कोल्हापूरकरांच्या हातात असल्याचेही ते म्हणालेत. तर कोल्हापुरातील रस्त्यांसाठी आम्ही शासनाकडून निधी मंजूर करून आणला होता. तो रद्द करून बाकडी, ओपन जिम करिता वळवण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. यामधून कर्नाटक राज्यातील 40 टक्के कमिशनचा पॅटर्न कोल्हापुरात येऊ पाहत आहे, अशी टीका देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.