अपघाताच्या चौकशीची मागणी करणार, अपघातानंतर योगेश कदम यांची प्रतिक्रिया
माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश कदम यांच्या गाडीला कशेडी घाटात अपघात झाला आहे. कदम यांच्या गाडीला डम्परने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे
मुंबई : राजकीय नेत्यांचा सुरु असलेली अपघातांची मालिकेला काही ब्रेक लागत नाही. काही दिवसांपूर्वी भाजप आमदार जयकुमार गोरे, त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचा अपघात झाला आणि ते रूग्णालयात पोहचले. यानंतर आता आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात झाला आहे. मात्र दैव बलवत्तर म्हणून त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. तर त्यांच्या चालकाला आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीसाला दुखापत झाली आहे
माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश कदम यांच्या गाडीला कशेडी घाटात अपघात झाला आहे. कदम यांच्या गाडीला डम्परने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या धडकेत गाडीच्या मागील बाजूचा पूर्ण चेंदामेंदा झालाय. सुदैवाने यात योगेश कदम सुखरुप आहेत. मात्र त्यांच्या चालकाला आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीसाला दुखापत झाली आहे.
या अपघातानंतर आता आमदार कदम यांनी आपली प्रतिक्रीया दिली. तसेच या अपघाताच्या चौकशीची मागणी करणार असल्याची माहिती दिली आहे.