अखेर आशिष देशमुख यांचा नवा आशियाना ठरला; करणार घरवापसी, प्रवेशचा मुहूर्त ही ठरला
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर ब्रेकफास्ट झाला आणि दुसऱ्यांदा थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसचं भेटायला गेले. त्यामुळे ते राज्यातून बाहेर जाणार नाहीत. तर भाजपच्या वाटेवर जात पुन्हा घरवापसी करतील अशा चर्चा रंगल्या.
नागपूर : काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले माजी आमदार आशिष देशमुख हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ते आता नव्या पक्षात प्रवेश करणार आहेत. मध्यंतरी ते तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांना भेटले होते. तर केसीआर यांनी देशमुख यांना भारतीय राष्ट्र समिती पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाची ऑफर दिली होती. त्यामुळे ते केसीआर यांच्या पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा रंगली होती.
मात्र याच दरम्यान त्यांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर ब्रेकफास्ट झाला आणि दुसऱ्यांदा थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसचं भेटायला गेले. त्यामुळे ते राज्यातून बाहेर जाणार नाहीत. तर भाजपच्या वाटेवर जात पुन्हा घरवापसी करतील अशा चर्चा रंगल्या. पण त्याला मुहूर्त मिळत नव्हता.
पण आता त्यांचा पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. 18 जून रोजी कोराडी येथील नैवेद्यम नॉर्थ स्टारमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार आहे. देशमुख 6 वर्षांनंतर पुन्हा एकदा मायदेशी परतत आहेत. देशमुख सावनेर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता भाजपकडून व्यक्त केली जात आहे.