अखेर मोहोळचे माजी आमदार रमेश कदम येणार बाहेर; जामीन मंजूर झाल्याने आठ वर्षांनंतर येणार तुरुंगा बाहेर
अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात फसवणूक करून मोठा घोटाळा केल्याप्रकरणी मोहोळचे माजी आमदार रमेश कदम हे तुरूंगात होते. तर आठ वर्षानंतर न्यायालयाने याप्रकरणी दिलासा देताना त्यांना जामीन मंजूर केला आहे.
मुंबई : 20 ऑगस्ट 2023 | गेल्या आठ वर्षापासून तुरूंगात असणारे मोहोळचे माजी आमदार रमेश कदम अखेर बाहेर येणार आहेत. तब्बत आठ वर्षानंतर ते तुरूंगातून बाहेर येणार असून त्यांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांनी दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे. तर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात बोगस लाभार्थींच्या नावे त्यांनी कर्ज काढून घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. आता त्यांचा जामीन मंजूर झाला असून त्यांच्या स्वागतासाठी ठाण्यातील मध्यवर्ती तुरुंगा बाहेर कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केलीय. तर त्यांच्यात उत्साह पाहायला मिळत आहे.
Published on: Aug 20, 2023 12:09 PM