Bhaskar Khatgaonkar : ‘मला शरद पवारांनी मंत्री केलं..’, पक्षप्रवेशानंतर खतगावकरांचं अजितदादांसमोरच मोठं विधान

| Updated on: Mar 23, 2025 | 5:23 PM

Bhaskar Khatgaonkar Join NCP Ajit Pawar Group : माजी खासदार भास्करराव खतगावकर यांनी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांना महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याच्या शुभेच्छा दिल्या.

माजी खासदार भास्करराव खतगावकर यांनी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस गटात प्रवेश केला आहे. भास्करराव खतगावकर हे अशोकराव चव्हाण यांचे मेहुणे आहेत. पक्ष प्रवेशाच्या वेळी भाषण करताना खतगावकर म्हणाले की, 1991 ला मला अशोक चव्हाण यांनी नाही, तर शरद पवार यांनी मंत्री केलं होतं. विशेष म्हणजे हे विधान खतगावकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच केलं. पुढे बोलताना खतगावकर म्हणाले की, गेली पन्नास वर्ष मी नांदेड जिल्ह्यात राजकारण करतो आहे. मला राजकारणातली हवा कळते, त्यानूसार मी सांगतो की पुढच्या विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात पाच आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून येतील. एक वडीलधारा व्यक्ती म्हणून मी तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो. समोर बसलेल्या लोकांच्या साक्षीने महाराष्ट्राची कुलस्वामानी तुळजाभवानीला साकडं घालतो की अजितदादा तुम्हाला या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळो, अशा शुभेच्छा देखील यावेळी भास्करराव  खतगावकर यांनी अजित पवारांना दिल्या.

Published on: Mar 23, 2025 05:23 PM
Dharashiv Protest News : ‘तो आमचा विठ्ठल..’ धाराशीवमध्ये खोक्या भोसलेच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
Jejuri News : ‘.. तर गावबंदी करू’, मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध