‘अजून एखादा पक्ष फोडावा…’ भाजपचे नाव न घेता राजू शेट्टी यांची घणाघाती टीका
त्यापार्श्वभूमिवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी हे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी सरकारला आठ दिवसांचा अल्टीमेट देत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. याचवेळी त्यांनी राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे.
जळगाव, 30 जुलै 2023 | पावसामुळे जळगाव जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले आहे. त्यापार्श्वभूमिवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी हे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी सरकारला आठ दिवसांचा अल्टीमेट देत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. याचवेळी त्यांनी राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे. राजू शेट्टी यांनी, सध्या राज्यात सत्तेसाठी फोडाफोडीचे राजकारण केलं जात असून अजून एखादा पक्ष फोडावा… अशी घणाघाती टीका भाजपचे नाव न घेता केली आहे. तर सध्याच्या सुरू असणाऱ्या राज्यातील या राजकारणाच्या खेळखंडोब्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे असा आरोप त्यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर केला आहे. तर अशा राजकारणामुळे आता मतदारांनीच या सर्वांना कात्रजचा घाट दाखवण्याची वेळ आल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे.
Published on: Jul 30, 2023 09:59 AM