Sambhaji Raje | ‘अरबी समुद्रातील महाराजांचा पुतळा का झाला नाही ते आताच्या सरकारनं सांगाव- संभाजीराजे
अरबी समुद्रात महाराजाचं स्मारक व्हावं असं सर्व शिवभक्तांची मागणी आहे. आपण स्वता: त्या उद्घाटन समारंभाला हजर होतो. पण ते का झालं नाही? हे ही अत्ताच्या सरकारनं सांगावं
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणण्यावरून विधानसभेत वक्तव्य केलं होतं. त्यावर आता राज्यभर पडसाद उमटत आहेत. तर पवार यांच्या त्याच विधानावरून स्वराज्य संघटनेचे प्रमुख माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही नाराजी व्यक्त करत विरोध दर्शवला आहे.
तसेच संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत, अजित पवार यांनी, कोणत्या आधारावर अजित पवारांनी वक्तव्य केले, असा सवाल केला. तर इतिहासाची मोडतोड करू नका अशी आपली माझी सर्व पुढाऱ्यांना विनंती असल्याचेही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे
याचबरोबर ‘अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकावरूनही संभाजीराजे यांनी अत्ताच्या सरकारला घेरलं. यावेळी त्यांनी अरबी समुद्रात महाराजांचा पुतळा का झाला नाही ते आताच्या सरकारनं सांगाव असहं म्हटलं आहे.