गौतमी पाटीलवरून संभाजीराजे यांचा यू टर्न अन् सुचक ट्विट ही; म्हणाले, ‘मी कला पाहिली, त्यामुळे…’

| Updated on: May 30, 2023 | 7:34 AM

गौतमीचे खरे आडनाव पाटील नाही, असा दावा करण्यात आला आहे. यावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. या मुद्यांवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया देताना कलाकाराला संरक्षण मिळालं पाहिजे, असं म्हटलं होतं.

मुंबई : सध्या नृत्यांगणा गौतमी पाटील हिची जोरदार चर्चा रंगली आहे. ती तिच्या नृत्यांगणा चर्चेत असतेच पण अधिक वादामुळे. आताही ती तिच्या आडनावामुळे चर्चेत आहे. गौतमीचे खरे आडनाव पाटील नाही, असा दावा करण्यात आला आहे. यावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. या मुद्यांवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया देताना कलाकाराला संरक्षण मिळालं पाहिजे, असं म्हटलं होतं. तर तिला पाठिंबा दिला होता. मात्र आता त्यांनी आपला पाठिंबा मागे घेतला आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट करत यात आपली प्रतिक्रिया दिली आहे. या ट्वीटमध्ये “महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण”, असं त्यांनी म्हटलं आहे. तर आज त्याचे नकारात्मक पडसाद उमटल्यावर आश्चर्याने या कलाकाराची ‘कला’ मी बघितली. त्यामुळे आता असे वाटत आहे. असेही त्यांनी म्हटलं आहे.

Published on: May 30, 2023 07:34 AM
नितेश राणे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर ठाकरे गट आक्रमक; कोणकनातील नेत्याने घेतला समाचार
लग्नघटिका जवळ येत असताना नववधू लिफ्टमध्ये अडकली अन्…