‘मी आता कन्फ्यूज? 9 मंत्री विकासाच्या नावाने ओरडायचे; आता जातात कुठे?’ संभाजीराजे छत्रपती यांचा खोचक सवाल

| Updated on: Jul 16, 2023 | 8:34 AM

यावेळी त्यांनी, बार्शीतील भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर टीका करताना येथे दहशत असल्याची घणाघाती टीका केली.

सोलापूर : स्वराज्य पक्षाचे प्रमुख माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची बार्शीत जाहीर सभा पार पडली. बार्शीतील पांडे चौकात त्यांची ही सभा पार पडली. यावेळी त्यांनी, बार्शीतील भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर टीका करताना येथे दहशत असल्याची घणाघाती टीका केली. त्याचबरोबर यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर टीका करताना राज्यात विरोधीपक्ष आहे की नाही..? अशी विचारणा केली आहे. तर असा सवाल करताना त्यांनी सत्तेत नुकताच प्रवेश केलेल्या अजित पवार यांच्यासह ८ मंत्र्यांवर टीका केली. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी, मी आता कन्फ्यूज झालोय की, हे 9 मंत्री विकासाच्या नावाने ओरडायचे. शाहू, फुले, आंबडेकर यांचे नाव घ्यायचे पण आता जातात कुठे? तर तिकडे असे म्हणत त्यांनी टीका केली आहे. तर सध्याचं राजकारणाचं गणित फार किचकट झालं आहे. शिवसेना सत्तेत पण आहे आणि विरोधात पण आहे. राष्ट्रवादी सत्तेत पण आहे आणि विरोधात पण आहे. ही लोकशाहीची थट्टा नाही का असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Published on: Jul 16, 2023 08:34 AM
शासन आपल्या दारी कार्यक्रमावर संजय राऊत म्हणतात; “पालकमंत्री कामात कमी पडतात…”
पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळणार? अजित पवार यांनी मारला डोळा, नेमकं काय घडलं?