Special Report | माजी आमदाराची जामीनावर सुटका? मोहोळमध्ये होणार पुन्हा सक्रीय? पण साथ कोणाला शरद पवार की अजित पवार?

| Updated on: Aug 21, 2023 | 8:07 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम हे तब्बल आठ वर्षांनी जामीनावर बाहेर आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी ठाण्यात त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. तर ते बाहेर येताच एकच जल्लोष केला होता.

मुंबई : 20 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम आठ वर्षानंतर तुरुंगाबाहेर आले. त्यांच्यावर अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी आरोप करण्यात आले होते. तर त्याच आरोपांमुळे ते आठ एक वर्ष तुरूगांत होते. त्यानंतर त्यांना आता जामीन मंजूर झाला आहे. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ घोटाळ्याप्रकरणी रमेश कदम यांना २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. तर पहिल्यांदा त्यांना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची रवानगी ठाण्यातील तुरूगांत करण्यात आली होती. तर त्यांच्याविरोधात दावा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी लाचलुचपत सह सर्व विभागांकडे गैरव्यवहारप्रकरणी तक्रार केली होती. त्यानंतर आता अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार रमेश कदम यांच्यावर ७३ जणांची भरती, गृहकर्ज वाटप, १५ लाखांची लाच, कर्ज प्रकरणावर खोट्या सह्या, लाभार्थींचे धनादेश परस्पर वाटप, असे आरोप ठेवण्यात आले होते. पण आता ८ वर्षानंतर बाहेर आलेले कदम यांनी आपण पुन्हा एकदा मोहोळमध्ये सक्रीय होण्याचे संकेत दिले आहेत. तर याच्याआधी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सध्याच्या राष्ट्रवादीत सुरू असलेल्या कलहाच्या वेळी ते कोणाला साथ देतात? ते शरद पवार गट की अजित पवार गट यापैकी कुणाकडे जातात हे पाहण महत्वाचं ठरणार आहे. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट

Published on: Aug 21, 2023 08:07 AM
‘दंगल पेटवण्याचं त्याला कॉन्ट्रक्ट, तो तर किडे’; राष्ट्रवादीचा नेता संभाजी भिडे यांच्यावर भडकला
Special Report | शरद पवार यांच्या सभेला अजित पवार प्रत्युत्तर देणार? काका-पुतण्यात राजकारणावरून संघर्षाला धार?