Dr. Manmohan Singh : देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा अल्पपरिचय
डॉ. मनमोहन सिंग हे एक विचारवंत आणि अभ्यासक म्हणून ओळखले जातात. कामाप्रती असलेला शैक्षणिक दृष्टिकोन, जनसामान्यांसाठी असलेली उपलब्धता आणि विनम्र आचरण यामुळे ते कायमच चर्चेत असायचे.
भारताचे माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं काल रात्री (26 डिसेंबर) निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंह यांनी देशाला यशाच्या एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. 1991 साली केंद्रीय अर्थमंत्री असताना डॉ. मनमोहन सिंग यांनी घेतलेला उदारीकरणाचा निर्णय ऐतिहासिक ठरला. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वळणाचे जनक म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांना ओळखले जाते. हे एक विचारवंत आणि अभ्यासक म्हणून ओळखले जातात. कामाप्रती असलेला शैक्षणिक दृष्टिकोन, जनसामान्यांसाठी असलेली उपलब्धता आणि विनम्र आचरण यामुळे ते कायमच चर्चेत असायचे.
डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्रालयात अनेक महत्वाची पद भूषवली. यात अर्थ मंत्रालयाचे सचिवपद , नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद, रिझर्व बँकेचे गव्हर्नरपद, पंतप्रधानांचे प्रमुख आर्थिक सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद या पदांचा समावेश होता. यानंतर 1991-1996 या पाच वर्षांच्या काळात ते भारताचे अर्थमंत्री होते.