NCP Political Crisis : अजित पवार गटातून आऊट गोईंन सुरू? कोल्हे यांच्यानंतर आणखी चार आमदार पडले बाहेर

| Updated on: Jul 03, 2023 | 5:57 PM

येथे अजित पवार यांनीच बंड करत आपल्यासोबत 30 आमदार आणि काही खासदार नेले. त्यावरून आता टीका होताना तर पुढील वाटचाल ठरवताना दोन्हीकडून दिसत आहे. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे या वयातही आपला झंझावात कायम ठेवत राज्यभर दौरा करणार आहेत.

मुंबई : राज्यात सध्या शिवसेनेत ज्यापद्धतीने सत्ता संघर्ष रंगला होता तसाच आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पहायला मिळत आहे. येथे अजित पवार यांनीच बंड करत आपल्यासोबत 30 आमदार आणि काही खासदार नेले. त्यावरून आता टीका होताना तर पुढील वाटचाल ठरवताना दोन्हीकडून दिसत आहे. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे या वयातही आपला झंझावात कायम ठेवत राज्यभर दौरा करणार आहेत. त्यामुळे त्यांना मिळत असलेली सहानुभूती पाहता अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार आता परतत आहेत. याच्या आधी खासदार अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता 4 आमदार अजित पवार यांची साथ सोडत शरद पवार यांच्याकडे परतले आहे. यामध्ये मकरंद पाटील, राजू नवघरे, शशिकांत शिंदे, मानसिंगराव नाईक हे आमदार असून राजू नवघरे यांनी ज्या मानसानं आपल्याला मोठं केलं त्याला कसं सोडणारं असा सवाल करत आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं म्हटलं आहे.

Published on: Jul 03, 2023 05:57 PM
Sharad Pawar News : भुजबळ, तटकरे, वळसे पाटील यांच्या प्रश्नाचा शरद पवार यांनी निकालच लावला, पहा काय म्हणाले?
मोठी बातमी! शरद पवार यांनी घेतली प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची विकेट; केली पक्षातून हकालपट्टी