सेमीकंडक्टर प्रकल्पात फॉक्सकॉनच नाही? महाराष्ट्रातून पळवल्याने लागली पनवती

| Updated on: Jul 11, 2023 | 9:23 AM

शिवसेना ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करताना फक्त दिल्ली तख्ताला खूश करण्यासाठी हा प्रकल्प गुजरातच्या झोळीत टाकला अशी टीका केली होती.

मुंबई : गेल्या वर्षी वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकार आणि विरोधकांच्यात चांगलाच वाद झाला होता. त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करताना फक्त दिल्ली तख्ताला खूश करण्यासाठी हा प्रकल्प गुजरातच्या झोळीत टाकला अशी टीका केली होती. हाच वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प आता अडचणीत सापडला असून आता गुजरातमधील त्याच्या भवितव्यालाच ब्रेक लागला आहे. तैवानची कंपनी असणाऱ्या फॉक्सकॉनने वेदांता लिमिटेडसोबतचा असलेला त्यांचा करार तोडला आहे. ज्यामुळे आता यात फॉक्सकॉन नसेल. याच्या आधी फॉक्सकॉन आणि वेदांत यांनी महाराष्ट्रात गुंतवणुकिची तयारी दाखवली होती. तसेच त्यासाठी महाराष्ट्रात चाचपणी सुरू होती. मात्र काही कारणास्तव हा $19.5 अब्ज गुंतवणुकीचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये गेला. ज्यानंतर राज्यात याचे तीव्र पडसाद उमटले होते.

Published on: Jul 11, 2023 09:23 AM
अखेर डोळ्याचे पारणे फेडणारा सहस्त्रकुंड धबधबा झाला प्रवाहीत; नागरिकांची मोठी गर्दी
असं, कसं? शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपचे लोक काँग्रेसच्या वाटेवर? बघा एकनाथ खडसे यांनी नेमका काय दावा केला…