Dombivli Gold Theft | सोन्यासाठी सोन्यासारख्या मैत्रित दगाबाजी, मित्रानेच केला मित्राचा घात, पोलिसांनी केली अटक
Dombivli Gold Theft | मित्रानेच मित्राला सोन्यासाठी दगा दिल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरुन आरोपीला अटक करुन त्याच्याकडील 35 लाख रुपयाचे दागिने हस्तगत केले.
Dombivli Gold Theft | डोंबिवलीमध्ये (Dombivli) सोन्याच्या मोहापायी एका मित्राने दुसऱ्याला दगा दिल्याची घटना उघड झाली आहे. विश्वनाथ जगताप (Vishwanath Jagtap) असे या धोकेबाज मित्राचे नाव आहे. त्याने नवीन ज्वेलर्सचे दुकान उघडणार असल्याचे सांगत डिस्प्लेवर लावण्यासाठी ज्वेलर्स मित्राच्या दुकानातून 35 लाख रुपयाचे सोन्याचे दागिने घेऊन लंपास केले होते. रामनगर पोलिसांनी (Ram Nagar Police) पुण्यातून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अजय जैन हे डोंबिवली पूर्वेत राहतात. त्यांचं सोन्याचं दुकानं आहे. जगताप हा त्यांचा मित्र होता. नव्याने ज्वेलर्सच्या व्यवसायात उतरण्यासाठी 700 ग्राम वजनाचे 35 लाख रुपयाचे दागिने डीस्प्लेवर लावण्यासाठी दिले. मात्र हे सोनं मिळताच जगतापने आपल्या सोन्या सारख्या मित्राला दगा दिला. आरोपीला बेड्या ठोकत त्याच्याकडून 35 लाख रुपयाचे दागिने हस्तगत केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली.