Special Report | खान विरुद्ध पठाण... दोघांमध्ये भारतावरुन घमासान?

Special Report | खान विरुद्ध पठाण… दोघांमध्ये भारतावरुन घमासान?

| Updated on: Sep 08, 2022 | 10:35 PM

एकाचवेळी मैदानात पाकिस्तान-अफगाणिस्तानचे खेळाडू भिडले. दुसरीकडे प्रेक्षकांनी मारामारी केली आणि तिसरीकडे मैदानाच्या बाहेर सुद्धा प्रेक्षक एकमेकांच्या अंगावर धावून गेले.

दिल्ली : एकीकडे मैदानाच्या आतमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे खेळाडू हाणामारीवर आले होते. आणि दुसरीकडे प्रेक्षक गॅलरीत बसलेले पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे क्रिकेट चाहते एकमेकांची डोकी फोडत होते. एकीकडे पाकिस्तानचे खान होते आणि दुसरीकडे अफगाणिस्तानचे पठाण. ज्यांना खुर्च्यांनी मारहाण होतेय, ते पाकिस्तानी प्रेक्षक आहेत आणि ज्यांच्याकडून मार दिला जातोय ते अफगाणिस्तानचे क्रिकेट चाहते. काहींनी थेट डोक्यात खुर्ची घालून मारण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी लांबून एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकल्या. एकाचवेळी मैदानात पाकिस्तान-अफगाणिस्तानचे खेळाडू भिडले. दुसरीकडे प्रेक्षकांनी मारामारी केली आणि तिसरीकडे मैदानाच्या बाहेर सुद्धा प्रेक्षक एकमेकांच्या अंगावर धावून गेले.

Published on: Sep 08, 2022 10:35 PM
अंबानी कुटुंबानं घेतले लालबागच्या राजाचे दर्शन; पैशाचा हार बाप्पाच्या गळ्यात घातला
Special Report | शाहांच्या मुंबई दौऱ्यात यंत्रणांचं दुर्लक्ष झालं?