इम्तियाज जलील मुक्तीसंग्रामदिनी गैरहजर राहतात, नेमका काय संदेश द्यायचाय?- गजानन काळे
मनसे नेते गजानन काळे यांनी एमआयएम आणि इम्तियाज जलील यांच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी एमआयएम आणि इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. “सलग 2 वर्ष MIM चे खासदार इम्तियाज जलील मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी गैरहजर आहेत. नेमका त्यांना यातून काय संदेश द्यायचा आहे?, असं सवाल त्यांनी विचारलाय. मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचा आणि मराठवाड्यातील जनतेचा अपमान करून त्यांना कोणाला खुश करायचे आहे? की हा मराठवाडा मुक्तीसंग्रामचा लढाच त्यांना मान्य नाही. ही आधुनिक निजामाची नव रझाकार अवलाद महाराष्ट्रातून निवडून येते. याची लाज वाटते. यांच्या मतांच्या जीवावर उध्दवजी ठाकरे गटाचे अंबादास दानवे विधानपरिषदेला निवडून येतात आणि राज्यसभा खासदारकीला ही या MIM च्या मतांची मदत घेऊन उद्धव ठाकरे यांची नवाब सेना स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी म्हणवते, असं गजानन काळे म्हणालेत.