“…तोपर्यंत मविआ तरी टीकेल का?” अमोल किर्तिकरांच्या उमेदवारीबाबत गजानन किर्तिकर म्हणतात…
शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर यांना ठाकरे गटाकडून तिकीट दिले जाणार आहे. यावर गजानन कीर्तीकर यांनी भाष्य केलं आहे. 2024 मध्ये मी लोकसभा निवडणूक लढवेल की नाही मला माहीत नाही.
मुंबई : शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर यांना ठाकरे गटाकडून तिकीट दिले जाणार आहे. यामुळे कीर्तिकर पिता-पुत्रात वाद होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता गजानन कीर्तिकर यांनी यावर पडदा टाकला आहे. 2024 मध्ये मी लोकसभा निवडणूक लढवेल की नाही मला माहीत नाही. लोकसभेचा उमेदवार म्हणून महाविकास आघाडीने अमोलला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. पण लोकसभा निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडी टीकेल की, नाही हे सांगता येत नाही, असं कीर्तिकर यांनी सांगितलं. काही महिन्यांनी आघाडीच संपुष्टात येईल, असा दावाही त्यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी गजानन कीर्तिकर यांनी भाजप सापत्न वागणून देत असल्याचा आरोप केला होता, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती.
Published on: Jun 01, 2023 08:44 AM