भाजपच्या वाटेवर असणाऱ्या गज्जू यादव यांचे निलंबन रद्द -tv9

| Updated on: Aug 18, 2022 | 9:53 AM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पॅचम केलं आहे. भाजपच्या वाटेवर असणाऱ्या गज्जू यादव यांचे निलंबन रद्द आहे.

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यावर आघाडीतील अनेक नेते त्यांच्या पक्षातून फुटले आहेत. शिवसेनेतून शिंदे गट तयार झाल्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दररोज हादरे बसत आहेत. असेच काहीसे हादरे काँग्रेसला बसण्याची चिन्ह समोर येत होती. त्याआधीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पॅचम केलं आहे. भाजपच्या वाटेवर असणाऱ्या गज्जू यादव यांचे निलंबन रद्द आहे. गज्जू यादव यांचे काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी कालच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर काँग्रेसमध्ये खळबळ माजली होती. तर गज्जू यादव हे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर आता त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. यादव हे नागपूर जिल्हा काँग्रेसचे माजी महासचिव आहेत.

Published on: Aug 18, 2022 09:53 AM
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 18 August 2022 -TV9
Bachchu Kadu : ’15 सप्टेंबरला मंत्रिमंडळ विस्तार! मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिलाय’ बच्चू कडू म्हणतात, मी नाराज नाही