Ganesh Chaturthi 2022: मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान
गणेशोत्सव
Image Credit source: TV9 Marathi

Ganesh Chaturthi 2022: मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान

| Updated on: Aug 31, 2022 | 2:24 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर गणपतीची स्थापना केली. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे हे पहिलेच गणेशोत्सव आहे.

आज घरोघरी बाप्पांचे आगमन झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी देखील गणरायाचे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर गणपतीची स्थापना केली. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे हे पहिलेच गणेशोत्सव आहे. संपूर्ण परिवाराच्या उपस्थितीत गणरायाची पूजा आणि आरती करण्यात आली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी देखील कुटुंबियांसोबत गणेशाची प्रतिष्ठापना केली. देशासमोरचे आणि राज्यासमोरचे विघ्न दूर होऊ दे असे साकडे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी गणरायाला घातले.

Published on: Aug 31, 2022 02:21 PM
‘महाराष्ट्रात सुख, समृद्धी येवो’; अमृता फडणवीसांचं बाप्पाकडे साकडं
Ganeshotsav 2022: अमरावतीत राणा दाम्पत्याच्या घरी बाप्पांचे आगमन, खासदार नवनीत राणा यांनी स्वतः बनविले मोदक