ढोल ताशांच्या गजरात कोल्हापुरातील मानाच्या गणपतीचं विसर्जन
पारंपरिक वाद्यांमुळे सगळ्या गोष्टींना कोल्हापूर शहरात डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणूक होत आहे. त्यामुळे शहराने वेगळा पायंडा पाडला असल्याची भावना सतेज पाटी यांनी व्यक्त केली. यावेळी शाहू महाराजांनीही कोल्हापुरातील पहिल्या मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवत गणेश मंडळांना मिरवणुका शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.
सलग दोन वर्षानंतर कोल्हापुरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे, त्यामुळे कोल्हापुरातील पहिल्या मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरु झाली असून कोल्हापुरातील अनेक नेत्यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला आहे. यावेळी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी टीव्ही 9 बोलताना सांगितले की, यावेळी निर्बंधमुक्त गणेशोत्सव कोल्हापुरात साजरा होत असून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका निघत आहेत. सध्या कोल्हापूरमध्ये पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणुकांना प्रारंभ झाला असून पारंपरिक वाद्यांमुळे सगळ्या गोष्टींना कोल्हापूर शहरात डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणूक होत आहे. त्यामुळे शहराने ए वेगळा पायंडा पाडला असल्याची भावना सतेज पाटी यांनी व्यक्त केली. यावेळी शाहू महाराजांनीही कोल्हापुरातील पहिल्या मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवत गणेश मंडळांना मिरवणुका शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.