Ganesh Festival 2022 : मुंबईत गणेशोत्सवाची धुम, जीएसबी गणरायाचं मुखदर्शन
मुंबईमध्ये देखील ठिकठिकाणी गणपती मंडपामध्ये आणले जात असून बाप्पाचं धुमधडाक्यात आगमन केलं जातंय. यावेळी डीजेवर तरुणाई ताल धरताना दिसत आहे. तर बच्चे कंपनी देखील मोठ्या हर्ष-उल्हासामध्ये आहे.
मुंबई : गणेशोत्सवाला (Ganesh festival 2022) काहीच दिवस बाकी आहेत. यातच मुंबईत (Mumbai) मानाचे गणपती विराजमान होताना दिसत आहे. लालबाबगचा राजा (Lalbaugcha Raja 2022) आलाय. त्यानंतर जीएसबी गणरायाचं देखील आगमन झालंय. राज्यासह ठिकठिकाणी गणेशोत्सवाचा उत्साह दिसत आहे. मुंबईमध्ये देखील ठिकठिकाणी गणपती मंडपामध्ये आणले जात असून बाप्पाचं धुमधडाक्यात आगमन केलं जातंय. यावेळी डीजेवर तरुणाई ताल धरताना दिसत आहे. तर बच्चे कंपनी देखील मोठ्या हर्ष-उल्हासामध्ये गणरायाच्या आगमनाचा आनंद लुटताना दिसत आहे. कोरोनानंतर आता राज्यात निर्बंधमुक्त सण-उत्सव साजरे होतायत. यात यंदाचा गणेशोत्सव विशेष असणार इतकं मात्र नक्की. गणेशोत्सव जवळ येत असताना मंडळांमध्ये गर्दी दिसून येत आहे. बच्चे कंपनींसह तरुण देखील मंडळांच्या कामात गुंतले आहेत. जीएसबी गणरायाचं देखील आगमन झालं आहे.
Published on: Aug 29, 2022 09:57 PM