robbers jailed | झारखंडमधील दरोडेखोरांची टोळी जेरबंद, पुणे पोलिसांची जबरदस्त कामगिरी
robbers jailed | झारखंड राज्यातील दरोडखोरांच्या टोळीतील दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
robbers jailed | झारखंड राज्यातील (Jharkhand State) दरोडखोरांच्या टोळीतील (Robbers Gang) दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील दोघांना पोलिसांनी (Police) अटक केली. त्यांच्याकडून मुद्देमाल ही पोलिसांनी जप्त केला. वेळीच या टोळीचा पर्दाफाश केल्याने पुढील अनेक घटनांना प्रतिबंध घालण्यात यश आले. हे चोरटे झारखंड राज्यातील आहेत . पुणे शहर आयुक्तालयातंर्गत लोणीकंद पोलीस स्टेशनने ही कामगिरी बजावली आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी तब्बल 1 कोटी 53 लाख 98 हजार 100 रुपयांची रोकड जप्त केली आहे. फक्त रोकडच नाही तर पोलिसांनी या अट्टल गुन्हेगारांकडून अॅपल (Apple) कंपनीचे तब्बल 197 मोबाईल ही जप्त केले आहे. पोलिसांकडून करण्यात आलेली ही मोठी कारवाई आहे. दोन चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. लोणीकंद पोलिसा ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे. या कारवाईत मोठा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.