गौतमी पाटील शाळेत नाचली; शिक्षणमंत्री म्हणाले, ‘नाचवलं तो घरी जाईल’
नाशिकच्या वलखेड गावात जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावरून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर भलतेच संतापले आहेत. तसेच यावरून त्यांनी विरोधकांवरही टीका केलीय.
सांगली : 29 सप्टेंबर 2023 | नाशिकच्या दिंडोरी येथील जिल्हा परिषद शाळेतील गौतमी पाटील हिच्या डान्स प्रकरणाची शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गंभीर दखल घेतलीय. या प्रकरणावरून त्यांनी नाराजी व्यक्त केलीय. मुलांच्या शाळेसाठी चांगल्या सुविधा निर्माण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी पैसे येत आहेत. त्याला आक्षेप घेण्यासारखे काय आहे? पण, गौतमी पाटील यांना नाचवून एका चांगल्या योजनेला बदनाम केले जात आहे असे ते म्हणाले. गळक्या खोल्या, पडकी छप्पर हे महाराष्ट्राचे चित्र बदलायचे आहे. या शाळेत गौतमी पाटील हिला कोणी नाचवलं हे माहित नाही. पण, या प्रकरणाची चौकशी केली जाईल. ज्याने गौतमी पाटील हिला नाचवलं तो घरी जाईल, असा इशाराही मंत्री केसरकर यांनी दिला.
Published on: Sep 30, 2023 10:30 PM