छोटा पुढारी घनश्याम दरोडे याच्या चॅलेंजला गौतमी पाटील हिचं आवाहन; म्हणाली, “कार्यक्रमाला येऊन तरी जा”
गेल्या अनेक दिवसांपासून ती वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. अशातच गौतमीच्या आडनावावरुन नुकताच वाद निर्माण झाला आहे. त्यातच तिला छोटा पुढारी धनश्याम दरोडे याने डिवचले आहे.
पुणे : नृत्यांगणा गौतमी पाटीलचं नृत्य आणि तिच्या कार्यक्रमांवरुन होणारे वाद हे काही नवे नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून ती वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. अशातच गौतमीच्या आडनावावरुन नुकताच वाद निर्माण झाला आहे. त्यातच तिला छोटा पुढारी धनश्याम दरोडे याने डिवचले आहे. तसेच ओपन चॅलेंजही देत गौतमी पाटीलची भेट घेऊन समजावून सांगणार आहे. महाराष्ट्राच्या वतीने त्यांना समजून सांगणार आहे. त्यांना बदल करायला सांगणार आहे. महाराष्ट्र चांगला घडवायचा असेल तर महाराष्ट्राची संस्कृती एक राहिली पाहिजे. यावरून आता गौतमीने सडेतोड उत्तर दिलं आहे. तसेच मी, घनश्यामला एकच सांगते, तू आधी माझ्या कार्यक्रमाला ये. माझा कार्यक्रम बघ. त्यानंतर काही आरोप कर. तू डायरेक्ट माझ्यावर आरोप करशील तर मी सुद्धा ऐकून घेणार नाही. तू आधी कार्यक्रम बघ मग बोल”, अशा शब्दांत गौतमीने घनश्याम दरोडेला उत्तर दिलं आहे.