गौतमी पाटीलचा भाषणात तीन वेळा उल्लेख, ‘या’ कारणावरून शरद पवार संतापले
सध्या शाळा बंदचा वेगळा विषय झालाय. समायोजन संकल्पना शिक्षण खात्याने काढलीय हे धोरणं योग्य नाही. शाळा खाजगी संस्थांना चालवायला देणं चुकीचं आहे. तुम्हाला गौतमी पाटील माहित आहे का? त्या भगिणीचा डान्स शाळेत ठेवला.
अकोला : 12 ऑक्टोबर 2023 | शेती वर्ग दोनमधून एकमध्ये करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. पोलिसांच्या जागा कंत्राटी पद्धतीनं भरण्यास आमचा विरोध आहे. कंत्राटी पद्धतीनं आरक्षण राहणार नाही. उपेक्षित वर्गावर अन्याय होत आहे. महाष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं. पण. या खोक्यानी काय केलं हे तुम्हाला माहित आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप आणि शिंदे गटावर केली. नाशिकमधील एका शाळेत एक कार्यक्रम झाला. ती शाळा सरकारने दारू करणाऱ्या कारखान्याच्या मालकाला दत्तक दिली. गौतमी पाटील हे नाव ऐकलंय का? गौतमी पाटील हिचं नृत्य शाळेत झालं. पोरांना काय शिकवायचं? गौतमीचा धडा द्यायचा का? अशा शब्दात शरद पवार यांनी संताप व्यक्त केला. कुणासाठी करतो? काय करतो? नव्या पिढीवर काय संस्कार करतो? कशासाठी खासगीकरण करतोय? याचं भान राज्यकर्त्यांना राहिलं नाही अशी टीकाही शरद पवार यांनी केली.