Sandhya Dance Video Viral : ट्रेंड जरी गौतमीचा असला तरी खूळ खूळा मात्र संध्याच गाजवते, पहा व्हिडीओ
सध्या सोशल मीडियावर संध्याच्या डान्स व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. प्रत्येक चाहता म्हणतोय सबसे हटके संध्या के झटके. संध्याने खूळ खूळा या गाण्यावर तूफानी डान्स केला आहे. त्यामुळे गौतमी पाटील प्रमाणे संध्याचे चाहते देखील वाढू लागले आहेत.
Sandhya Dance Video Viral : ‘सबसे कातील गौतमी पाटील‘ (Gautami Patil) याच वाक्याने आणि गौतमी पाटीलच्या दिलखेच अदानी महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावलं आहे. डान्सर गौतमी पाटीलच्या लावणीच्या आणि डान्सच्या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्याचबरोबर सध्या सोशल मीडियावर गौतमी पाटील हिची मैत्रीण संध्याची जोरदार चर्चा आहे. संध्याचे डान्सचे व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये संध्याने तुफानी डान्स केला आहे.
सबसे हटके संध्या के झटके
सध्या गौतमीच्या कार्यक्रमामधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात स्टेजवर गौतमी पाटीलचा बॉनर लावला आहे. पण या कार्यक्रमाच्या ठिकाणी गौतमी पाटील नसून गौतमीच्या पाठीमागे डान्स करणारी नृत्यांगना आहे. ज्यात तिने काळजामधी खुळ खुळ करू लागला या गाण्यावर डान्स केला आहे. तिचे ठुमके आणि डान्समधील अदानी चाहत्यांना घायाळ केलं आहे.
तिच्या या व्हिडीओला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. मोठ्या प्रमाणात कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काही जणांनी गौतमीला टक्कर, काय नाचते राव अशा कमेंट्स सोशल मीडियावर केल्या आहेत. तिच्या या तूफानी डान्सची सर्वत्र चर्चा सुरु आहे.