अवघ्या एका रुपयांत लग्न! दोंडाईचात 12 जणांचा सामूहिक विवाहसोहळा
एक रुपयाला विवाह (Marrige) कधी लागतो का? पण दोंडाईचात हे शक्य झालं अन् गेल्या १५ वर्षांपासून शक्य करून दाखवलं गरीब नवाज वेलफेअर संस्था दोडाईचा यांनी करून दाखवल, थाटामाटात पार पडलेला सामुदायिक विवाह सोहळ्याने आजवरच्या परंपरेला चारचाँद लावले.
एक रुपयाला विवाह (Marrige) कधी लागतो का? पण दोंडाईचात हे शक्य झालं अन् गेल्या १५ वर्षांपासून शक्य करून दाखवलं गरीब नवाज वेलफेअर संस्था दोडाईचा यांनी करून दाखवल, थाटामाटात पार पडलेला सामुदायिक विवाह सोहळ्याने आजवरच्या परंपरेला चारचाँद लावले. या वेळी १२ दाम्पत्य विवाहबंधनात अडकले. गरीब नवाज वेल्फेअर संस्थेतर्फे या अनोख्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. प्रत्येक जोडप्याकडून १०० लोक आले होते. त्यांच्या जेवण, नाश्त्याची सोयसुद्धा करण्यात आली होती. ख्वाजा गरीब नवाज यांच्या ऊर्सनिमित्त (yatra) हा सोहळा आयोजित केला होता. गरीब नवाज वेल्फेअरचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष हाजी नबू हाजी बशिर पिंजारी यांच्यातर्फे प्रत्येक जोडप्याला गादी, पलंग, फ्रिज, कपाट, कूलर, गॅस कनेक्शन व २५ संसारोपयोगी भांडी देण्यात आली. आसिफ अलबेला यांच्या हस्ते हे साहित्य वाटप करण्यात आले.
Published on: Feb 10, 2022 12:27 PM