Special Report | यंदा ‘गांधी’ ऐवजी दुसरा कॉंग्रेस अध्यक्ष होईल का?
पत्राच्या पुढच्या भागात कांग्रेसचा पंजा सोडण्यामागे आझादांनी 5 कारणं दिली आहेत. या पाचही कारणांचं बोट त्यांनी राहुल गांधींकडे रोखलंय.
नवी दिल्ली : सोनिया गांधींना 5 पानांचं पत्र लिहून गुलाम नबी आझादांनी काँग्रेसला रामराम केलाय. पत्रात काँग्रेस दुरावस्थेचं कारणाला आझादांनी राहुल गांधींना जबाबदार धरलंय. खरमरीत आशय असलेल्या या पत्राचं पहिलंच वाक्य आहे की, बड़े अफसोस के साथ काँग्रेस से सदी पुराना नाता तोड़ने का फैसला किया है. इन दिनो काँग्रेस को ‘भारत जोड़ों’ यात्रा की जगह ‘काँग्रेस जोड़ो’ यात्रा निकालनी चाहिए! पत्राच्या पुढच्या भागात कांग्रेसचा पंजा सोडण्यामागे आझादांनी 5 कारणं दिली आहेत. या पाचही कारणांचं बोट त्यांनी राहुल गांधींकडे रोखलंय. पहिलं कारण राहुल गांधींनी अवतीभवती अनुभवशून्य लोकांचा गोतावळा जमा करुन ज्येष्ठांना साईडलाईन केलं. दुसरं कारण, कधी-कधी असं वाटतं की, राहुल गांधींचे सुरक्षारक्षक आणि त्यांचा स्टाफच पक्षाचे निर्णय घेतात. तिसरं कारण जेव्हा राहुल गांधी काँग्रेसचे उपाध्यक्ष बनले, तेव्हापासून काँग्रेसच्या मूळ कार्यपद्धतीला तिलांजली मिळाली. चौथं कारण राहुल गांधींच्या कार्यपद्धतीनं सल्लागार व्यवस्थेला मूटमाती दिली गेली
आणि पाचवं कारण तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंहांनी जारी केलेला जीआर जाहीरपणे फाडणं हे राहुल गांधींच्या अपरिपक्वतेचं लक्षण होतं. त्यामुळेच 2014 मध्ये काँग्रेसचं नुकसान झालं.