शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने रवाना; गिरीश महाजन यांचं महत्वाचं आवाहन, म्हणाले…
Giirsh Mahajan on Nashik Farmer long Morcha : मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या लाँग मार्चवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. पाहा ते काय म्हणालेत...
मुंबई : राज्याचे ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या लाँग मार्चवर प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांचा लॉंगमार्च मुंबईच्या दिशेने येत आहे. त्यामुळे आमचं त्यांना हेच आवाहन आहे की, शेतकऱ्यांनी स्वतःचे हाल करून घेऊ नयेत. मागच्या वेळी जेव्हा आंदोलन झालं, तेव्हा मी तिथे होतो. शेतकऱ्यांच्या पायाचे अक्षरशः साल निघाली होती. त्यामुळे मला एवढंच सांगायचंय की, शेतकऱ्यांनी सुद्धा सामंजस्याची भूमिका घ्यावी. त्यांच्या मागण्या कशा पद्धतीने पूर्ण होतील याबद्दल सरकार संपूर्ण विचार करत आहेत. एकत्र बसून सामंजस्यांनी हे सगळे प्रश्न मार्गी लागायला पाहिजेतय तिच सरकारची भूमिका आहे, असं महाजन म्हणालेत.