“मविआत मुख्यमंत्र्यांच पेव फुटलंय”, गिरीश महाजन यांची टीका
वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सोयी-सुविधांच्या पाहणीसाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे पंढरपूर दौऱ्यावर आहेत. आज आषाढी एकादशीनिमित्त त्यांनी विठ्ठाचे दर्शन घेतलं. दरम्यान त्यांनी दुष्काळग्रस्त भागात लवकरत पाऊस पडू दे, असं साकडं घातलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे.
पंढरपूर: वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सोयी-सुविधांच्या पाहणीसाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे पंढरपूर दौऱ्यावर आहेत. आज आषाढी एकादशीनिमित्त त्यांनी विठ्ठाचे दर्शन घेतलं. दरम्यान त्यांनी दुष्काळग्रस्त भागात लवकरत पाऊस पडू दे, असं साकडं घातलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, “भाजपा आणि शिवसेनेची युती कायम राहणार आहे. जे युती तोडून गेले त्यांचं काय झालं हे सर्वांनी पाहिलं आहे. पुढच्या निवडणूकीत आम्ही एकतर्फी विजय मिळवू. मविआचा कोणताही परिणाम भाजपा-शिवसेना युतीवर होणार नाही.मविआत मुख्यमंत्र्यांच पेव फुटलं आहे.”
Published on: Jun 29, 2023 03:06 PM