“सत्ता गेल्याचं दु:ख उद्धव ठाकरे यांना पचत नाहीय, म्हणून ते…”, भाजप नेत्याचं टीकास्त्र
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका करताना देवेंद्र फडणवीस यांचा उच्चार ‘कलंक’ असा केला. यावरून महाराष्ट्राच्या राजकारण तापलं आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरून भाजप आक्रमक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई: ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका करताना देवेंद्र फडणवीस यांचा उच्चार ‘कलंक’ असा केला. यावरून महाराष्ट्राच्या राजकारण तापलं आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरून भाजप आक्रमक झाली आहे. यावरून फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना मानसोपचाराची गरज असल्याचं म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “स्वत: कलंकित असताना दुसऱ्यावर असे आरोप करायचे उद्धव ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा नाही.सत्ता गेली म्हणून उद्धव ठाकरे यांचा तोल घसरतोय.ते बेताल वक्तव्य करत आहेत,” असं गिरीश महाजन म्हणतात.
Published on: Jul 12, 2023 02:59 PM