‘उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अस्वस्थ, दोघांनाही शिंदे यांची ऍलर्जी’; भाजप नेत्याची घणाघाती टीका
एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली होती. तर त्यांच्या आजारपणावरून देखील आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. यावरून भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी खरमरित टीका केली आहे.
नाशिक, 15 ऑगस्ट 2023 | गेल्या काही दिवसापासून शिंदे गटावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे गटाकडून टीका होत आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली होती. तर त्यांच्या आजारपणावरून देखील आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. यावरून भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी खरमरित टीका केली आहे. महाजन यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे अत्यंत अस्वस्थ आहेत. तर या दोघांनाही शिंदे यांची ऍलर्जी आहे. तर त्यांना आता दिवसा सुद्धा स्वप्न पडायला लागली आहेत. तर याच्या आधीच केंद्रीय नेतृत्वाने देखील स्पष्ट केलं आहे की 24 च्या निवडणूका एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातच लढणार आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी देखील स्पष्ट केले आहेत.