गिरीश महाजन यांचे मोठं विधान; ‘दादा सोबत आले आता, महाराष्ट्रात फक्त युतीच्या 48 जागा येतील’

| Updated on: Aug 01, 2023 | 11:40 AM

त्यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात राजकीय भूकंप करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं आणि आपल्या ८ आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. यानंतर आता या घटनेला महिना झाला आहे.

मुंबई, 01 ऑगस्ट 2023 | महाविकास आघाडीचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असणाऱ्या अजित पवार यांनी अनेकांना धक्का दिला. त्यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात राजकीय भूकंप करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं आणि आपल्या ८ आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. यानंतर आता या घटनेला महिना झाला आहे. तर जे अजित पवार यांच्यावर टीका करत होते असे भाजप आणि शिंदे गटाचे नेते आता त्यांची स्तुती करत आहेत. तर त्यांच्या येण्याने लोकसभेच्या निवडणुकीचे अनेक समिकरणे बदलली आहेत. यावरूनच भाजप नेते गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी, अजित पवारांना माहीत होतं मोदी शिवाय पर्याय नाही म्हणून ते आमच्याकडे सर्वची सर्व राष्ट्रवादी घेऊन आले असं म्हटलं आहे. तर लोकसभेत साडेतीनशे जागा येथील. तर महाराष्ट्रात दादासोबत आल्याने 48 जागा आमच्या येतील एकही महाविकास आघाडी किंवा इतर कोणाची येणार नाही असा दावा महाजन यांनी केला आहे. ते एका कार्यक्रमात जळगाव येथे बोलत होते.

Published on: Aug 01, 2023 11:40 AM
“व्यासपीठावर जावं की नाही, हा शरद पवार यांचा व्यक्तिगत प्रश्न, मात्र…”, संजय राऊत यांची टीका
“समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत”, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा