‘…अन्यथा ही वेळ आली नसती’; राऊत यांच्या शिंदे यांच्यावरील त्या टीकेला भाजप नेत्याचा पलटवार

| Updated on: Aug 15, 2023 | 11:00 AM

त्यांनी, ते २४ तास काम करताना म्हणूनच आजारी पडत आहेत. तर त्यांचे काम दिसत नाही. तर कधीही पद जाईल यातून त्यांची झोप उडालेली आहे. त्यामुळेच ते ऊठसूट हेलिकॉप्टरने साराऱ्यात शेतावर जाऊन आराम करातय.

नाशिक, 15 ऑगस्ट 2023 | ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाना साधत टीका केली होती. त्यांनी, ते २४ तास काम करताना म्हणूनच आजारी पडत आहेत. तर त्यांचे काम दिसत नाही. तर कधीही पद जाईल यातून त्यांची झोप उडालेली आहे. त्यामुळेच ते ऊठसूट हेलिकॉप्टरने साराऱ्यात शेतावर जाऊन आराम करातय. २४ तास काम आणि ७२ तास आराम असे त्यांच्या जीवनाचे गणित झाल्याची टीका केली होती. तसेच ते आराम करायला मुख्यमंत्री झालेत का असा सवाल केला होता. त्यावरून याच्याआधीच शिंदे गटाकडून राऊत यांना उत्तर देण्यात आलं आहे. त्यानंतर आता याच टीकेवरून त्यांना भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी देखील खरमरित प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी महाजन यांनी, शिंदे हे २४ तासापैकी २० ते २२ तास काम करणारे आहेत. त्यांना कार्यकर्ते आणि काम हा त्यांचा छंद आहे. तर वर्षातील १२ महिन्यातून गावी एक आठ दिवस जाणं यात काय चूक आहे. पण उद्धव ठाकरे हे तर घरातून बाहेरच पडले नाहीत. कोरोना काळात लोक मरत होते. रेमडिसिव्हर मिळत नव्हतं, कॉट, आक्सिजन मिळतं नवहता अशा वेळी मुख्यमंत्री असणाऱ्या ठाकरेंनी उंबरठा देखील ओलांडला नाही आणि राऊत आरोग्याच्या गप्पा मारतात. हाच सल्ला त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला असता तर हि वेळ त्यांच्यावर आली नसती असा टोला महाजन यांनी लगावला आहे.

Published on: Aug 15, 2023 11:00 AM
‘उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अस्वस्थ, दोघांनाही शिंदे यांची ऍलर्जी’; भाजप नेत्याची घणाघाती टीका
राज्यात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह; मुंबईत शिंदे, नागपूरात फडणवीस यांनी फडकवला झेंडा