“हिटलर कोण हे 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंना दाखवून दिलंय”, भाजपचा हल्लाबोल
रविवारी मुंबईतील वरळी परिसरात असलेल्या एनएससीआय डोम येथे ठाकरे गटाचेराज्यव्यापी शिबीर झाले. या शिबिरात बोलताना ठाकरेंनी थेट मोदी-शांहांवरच हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांचा हिटलर असा उल्लेख केला. यावर भाजपने आता उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
जळगाव: रविवारी मुंबईतील वरळी परिसरात असलेल्या एनएससीआय डोम येथे ठाकरे गटाचेराज्यव्यापी शिबीर झाले. या शिबिरात बोलताना ठाकरेंनी थेट मोदी-शांहांवरच हल्ला चढवला. “हिटलर सुद्धा असाच माजला होता. हिटलर अचानक जन्माला नाही आला. त्याने थेट अत्याचाराचे टेंडर काढले नाही. त्याने मीडियाला कंट्रोल केले. यानंतर हळू हळू अत्याचार सुरु केले. हिटलरचे चिन्ह ही स्वस्तिकच होते”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “25-30 वर्षे उद्धव ठाकरेंनी मोदींचे पाय धरले.मोदींचे फोटो लावून त्यांच्या स्टेजवर उभे राहून निवडून आलेत आणि आज उद्धव ठाकरे मोदींना हिटलर म्हणताय. हिटलर कोण आहे, हे 40 आमदारांनी उद्धव ठाकरे यांना दाखवून दिलं आहे.उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात केलेले पराक्रम हिटलरशाहीचे लक्षण होते.आज मोदींवर संपूर्ण देशाचा विश्वास आहे, त्यामुळे स्पष्ट बहुमत देऊन त्यांना खासदार पुन्हा पुन्हा निवडून देतात.उद्धव ठाकरेंनी स्वतःची अवस्था काय झाली आहे ते बघावं”, असं गिरीश महाजन म्हणाले.