एकनाथ खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलं, वादग्रस्त विधानावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
एकनाथ खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलं, वादग्रस्त विधानावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल विचारलं असता गिरीश महाजन यांनी म्हटले की, यामध्ये एकनाथ खडसे यांचा दोष नाही. वाढते वय, अनेक आजार यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. राष्ट्रवादीत जाऊन त्यांना आमदारकी मिळाली नाही. त्यांच्या मुलीलाही लोकांनी नाकारले. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली.