सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर अमोल कोल्हेंचा पलटवार

| Updated on: Mar 04, 2024 | 10:29 PM

कलाकारांना राजकारणात यश मिळत नाही, शिरुर मतदार संघात सेलिब्रिटींना आणून आपण चूक केल्याची बोचरी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. यावर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अजितदादांवर पलटवार केला आहे. अजितदादाचे जुने व्हिडीओ दाखवून कोल्हे यांनी टीका केली आहे.

मुंबई | 4 मार्च 2024 : अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या सारख्या सेलिब्रिटींना उमेदवारी देऊन आपण चुक केल्याची उपरती राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राजकारणात एखादा उमेदवार अडचणीचा वाटला तर त्याला हरविण्यासाठी आम्ही राजकारणी सेलिब्रिटींना संधी देतो परंतू राजकारण कलाकारांचा काही पिंड नाही असेही अजित पवार म्हणाले. भाजपाने देखील हेमामालिनी, सनी देओल, धर्मेंद्र आणि गोविंदा यांना देखील उमेदवारी दिली होती. परंतू त्याना यश मिळाले नाही. अमिताभ बच्चन तर राजकारण आपला प्रांत नसल्याचे सांगत सोडचिट्टी दिली होती अशी टीका अजित पवार यांनी केली. त्यावर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जर सेलिब्रिटी काही कामाचे नाहीत तर तीन-तीन वेळा संसदरत्न आजपर्यंत कोणा कलाकाराला मिळालेत का ? असा पलटवार अमोल कोल्हे यांनी केला आहे. आपण शरद पवार गटात गेल्यानंतर आपल्याला दहा-दहा वेळा फोन का केले असाही हल्ला अमोल कोल्हे यांनी अजितदादांवर केला आहे.

Published on: Mar 04, 2024 10:28 PM
भाजपाशी मनसेची युती होणार? काय म्हणाले बाळा नांदगावकर
वेळीच गुंडांना आवर घाला… हर्षवर्धन पाटलांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गाऱ्हाणं तरी काय?