VIDEO: भाजपच्या गोवा निवडणुकीच्या यादीत utpal parrikar यांचं नाव नाही, Devendra Fadanvis यांची माहिती
गोव्यात भाजपने 40 पैकी 34 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पणजीतील जागेवर विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आजच्या भाजपच्या यादीत उत्पल पर्रीकरांचं नाव नाही.
गोवा विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना कोणत्या जागेचे तिटिक दिले जातेय याकडे सर्वांचे लक्ष आहे. गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यासाठीच्या 40 पैकी 34 जागांवरील उमेदवारांची यादी आज जाहीर केली. मात्र पणजीतील जागेवर विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आजच्या भाजपच्या यादीत उत्पल पर्रीकरांचं नाव नाही. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ पणजीत सध्याचे एमएलए यांनाच तिकिट देण्यात आले आहे. उत्पल पर्रीकर यांना इतर दोन पर्याय दिले आहेत. त्यापैकी एकाला त्यांनी आधीच नकार दिला आहे. दुसऱ्या जागेसंदर्भात चर्चा सुरु आहे. ते या जागेसाठी तयार होतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. तसंही भाजपने पर्रीकर परिवाराला नेहमीच आदर दिला आहे.’
Published on: Jan 20, 2022 02:34 PM