गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक; सोलापुरातही विविध ठिकाणी भेटी
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सध्या महाराष्ट्रात आहेत. काहीवेळा आधी त्यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. आज सकाळी ते सोलापुरातही होते. पाहा व्हीडिओ...
तुळजाभवानी : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सध्या महाराष्ट्रात आहेत. काहीवेळा आधी त्यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. प्रमोद सावंत सकाळीच सोलापुरात दाखल झाले. तुळजापूरला जाण्याआधी त्यांनी सोलापुरातील विविध ठिकाणी भेटी दिल्या. राष्ट्रवादीचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. दरम्यान, प्रमोद सावंत यांच्या भेटीमुळे राजन पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. माजी सहकार मंत्री, भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या घरीही त्यांनी भेट दिली. सावंत यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Published on: Feb 22, 2023 12:48 PM