गोव्याचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकरांनी मतमोजणी केंद्र सोडलं

| Updated on: Mar 10, 2022 | 11:56 AM

पणजीतून बाबूश मोन्सेरात,नावेलीतून उल्हास तुवेकर आणि सावर्डेतून गणेश गावकर विजयी झाले आहेत. तर मडगावमध्ये काँग्रेसचे दिगंबर कामत 7760 मतांनी जिंकले. तर दुसरीकडे गोव्याचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकरांनी मतमोजणी केंद्र सोडलं. 

देशातील अत्यंत महत्त्वाच्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल (Goa Assembly Elections) येत्या काही तासांत हाती येणार आहेत. एकीकडे सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आहे तर दुसरीकडे गोव्यासारखे लहानसे राज्य. विधानसभेच्या केवळ 40 जागा असल्या तरीही इथलं राजकारण मात्र प्रचंड गुंतागुंतीचं आहे.  आता गोव्यात पहिले चार निकाल जाहीर, तीन जागा भाजपला, तर काँग्रेसच्या बाजूने एक निकाल लागला आहे. पणजीतून बाबूश मोन्सेरात,नावेलीतून उल्हास तुवेकर आणि सावर्डेतून गणेश गावकर विजयी झाले आहेत. तर मडगावमध्ये काँग्रेसचे दिगंबर कामत 7760 मतांनी जिंकले. तर दुसरीकडे गोव्याचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकरांनी मतमोजणी केंद्र सोडलं.

Published on: Mar 10, 2022 11:56 AM