गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर एआय तंत्रज्ञानाचा वापर; आता श्वान वाचवणार लोकांचे जीव
समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी दृष्टी मरिनद्वारे सुरक्षा कार्यक्रम. समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षा व्यवस्थापनामध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर. पाहा व्हीडिओ..
पणजी, गोवा : गोव्यातील समुद्रात कुणी बुडत असेल तर आता त्याला जीवरक्षकदलातील श्वान वाचवणार आहेत. बचाव आणि समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षा कार्यात जीवरक्षकांना मदत करण्यासाठी प्रशिक्षित कुत्र्यांची एक टीम देखील तयार करण्यात अली आहे. या स्पेशल टीमला ‘पो स्क्वॉड’ असं नाव देण्यात आले आहे. गोव्यातील किनाऱ्यांवर घडलेल्या प्राणघातक घटनांमुळे दृष्टी जीवरक्षकदलाने समुद्रकिनाऱ्यावर खडकाळ आणि असुरक्षित क्षेत्रात बॅरिकेडिंग घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्र पण समुद्रकिनारी तैनात ठेवले आहेत. जे समुद्रकिनारी आलेल्या पर्यटकांचे निरीक्षण करण्यात मदत करणार आहेत. उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात जोखीम-प्रवण क्षेत्रांचे बॅरिकेडिंग आणि ‘स्विम विथ लाइफसेव्हर्स’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. जीवरक्षक एजन्सी आपल्या कृत्रिम बुद्धिमत्ता उपकरणांना सुस्थितीत आणण्याच्या प्रक्रियेत आहे.